Omicron Variant : ‘ओमिक्रॉन’चा धोका! राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
FIle Photo
FIle Photo

मुंबई l Mumbai

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या करोना व्हायरसच्या (Corona Virus) नवीन ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान भारतात आणि महाराष्ट्रातही यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

Omicron Variant : ओमिक्रॉनचं संकट! केंद्र सरकार सतर्क, राज्यांना दिल्या 'या' सूचना

याच पार्श्वभूमिवर नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव होऊ नये म्हणून राज्य सरकार प्रतिबंधात्मक पावलं उचलण्यास सुरू केली असून, आता राज्यात मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे, यामध्ये राज्यात निर्बंध लागू करणार का? यावर चर्चा करण्यात येणार आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये नव्या संसर्गाचा शिरकाव होऊ नये, या दहशतीमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णयही पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर आज मंत्रिमंडळाची तातडीने बैठक होणार आहे. एक डिसेंबरपासून होणाऱ्या बदलांबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता या बैठकीमध्ये होऊ शकते.

New Covid Strain : करोनाचा नवा व्हेरिएंट 'या' नावाने ओळखला जाणार

दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे. तसंच १३ देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

केंद्र सरकारनं ठरवलेल्या निकशाप्रमाणे १३ देशांची वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. या देशांमधून ओमिक्रॉनच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जातं आहे. या १३ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर राज्य सरकार विशेष लक्ष ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com