राज्‍यात आता मिशन ऑक्सिजन

ऑक्सिजन क्षमता तीन हजार मेट्रिक पर्यंत वाढवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
राज्‍यात आता मिशन ऑक्सिजन

मुंबई । प्रतिनिधी

करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्‍यात आता ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम सुरू करण्यात आली असून येत्‍या काही दिवसात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ३ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यात येणार असल्‍याची माहिती मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी बुधवारी दिली.

राज्‍यात लावलेल्‍या कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात का होईना रूग्‍णसंख्यावाढ रोखण्यात यश आले आहे.सक्रिय रूग्‍णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे.देशात तिसरी लाटही येण्याची शक्‍यता केंद्रातील तज्ञांनी वर्तविली आहे.ही तिसरी लाट आलीच तर तिलाही तोंड देण्यासाठी आतापासूनच आरोग्‍यसुविधा वाढविण्यास आपण सुरूवात केल्याचे ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.

राज्‍याची आजची ऑक्सिजन निर्मिती क्षमता १२०० मे.टन प्रतिदिन इतकी असल्‍याचे सांगून ठाकरे म्‍हणाले,आज दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. अधिकचा ऑक्सिजन आपण इतर राज्‍यांतून घेत आहोत.मात्र राज्‍याच्या ऑक्सिजन निर्मिती क्षमतेत वाढ करण्यात येत आहे.ती ३ हजार मे टनापर्यंत आपण वाढवणार म्‍हणजे वाढवणारच, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

.२५ एप्रिल रोजी राज्‍यात जवळपास ७ लाख सक्रिय रूग्‍ण होते.४ मे रोजी हेच प्रमाण ६ लाख ४१ हजारापर्यंत आले आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या ६ कोटी आहे.त्‍यांना १२ कोटी डोस लागतील.यासाठीची सर्व रक्‍कम आपण एकरकमी,एका चेकद्वारे देण्याची तयारी ठेवल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com