उत्तर मध्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वड्डे यांचे निधन

उत्तर मध्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वड्डे यांचे निधन
USER

मुंबई| प्रतिनिधी


उत्तर मध्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वड्डे यांचे मंगळवारी दीर्घआजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. संताक्रूज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधाकर वड्डे हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांनी काँग्रेस पक्षातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अनेक राजकीय पदे भूषविली होती. धनगर समाजाचे नेते स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे यांच्यासोबत त्यांनी समाजाच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com