पुण्यातील गणेशोत्सव:मिरवणुकांना बंदी

पुण्यातील गणेशोत्सव संदर्भात पुणे पोलिसांची नवी नियमावली
पुण्यातील गणेशोत्सव:मिरवणुकांना बंदी

पुणे

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जना पर्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवालाही मर्यादा आल्या आहेत. पुण्यातील गणेश उत्सव संदर्भात पुणे पोलीस प्रशासनाने आज (सोमवार) नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये मूर्ती खरेदी करणे, गणेश आगमन ते प्रतिष्ठापना यासर्वांबाबत नियम घालून देण्यात आले आहेत.श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत असे या नियमावलीत सांगण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी जारी केलेल्या नियमांमध्ये गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी असे सांगितले आहे. मनपा क्षेत्रीय कार्यालयात, शाळांची पटांगणं, मोकळ्या जागांवर मूर्ती विक्रीकराता परवानगी दिली जाईल. मात्र, रस्ता, पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले आहे.

मिरवणुकीला बंदी

श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी धार्मिक विधीसाठी कमीत कमी नागरिकांनी एकत्र यावं, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत, त्यांनी प्रतिष्ठापना मंदिरात करावी. अन्यथा नियम आणि अटी पाळून मंडळात छोटे मंडप करिता परवानगी दिली जाईल. सार्वजनिक मंडळांची गणेश मूर्ती चार फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट मर्यादित असावी असेही सांगण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com