बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणीही विसरु शकत नाही - संजय राऊत
महाराष्ट्र

बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणीही विसरु शकत नाही - संजय राऊत

अयोध्येत शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला आहे. तसेच या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान होते" तसेच "आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे." असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com