पुणे | Pune

पुण्यात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पाहायला मिळत आहे. काही दिवसांनंतर आता पुन्हा एकदा करोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने पुण्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरु होत्या.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन लावले जाणार नाही, मात्र कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत करोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये २१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. हॉटेल्स रात्री ११ ऐवजी १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर स्टॉलवर फक्त ५ लोकांनाच परवानगी असेल. होम डिलेव्हरी, मॉल, मार्केटही १० वाजेपर्यंतच सुरु राहतील. तर, लग्न आणि दशक्रिया अंत्यविधीसाठी ५० लोकांनाच परवानगी असेल.
....तर रविवारनंतर नाशिक होणार लॉकडाऊन; पाहा जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ.
दरम्यान, MPSC परीक्षा असल्यानं UPSC आणि MPSC ची अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच, सर्व सार्वजनिक उद्याने एकवेळ बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.

पुण्यातील स्थिती काय?

पुणे शहरात काल (गुरुवार) १ हजार ५०४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर काल दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ही रेट साडे सतरावर कायम असून, आजही ही टक्केवारी १७.५८ टक्के इतकी आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेली आहे. सध्या शहरात ८ हजार ५४१ रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३५७ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आतापर्यंत १२ लाख २० हजार ९०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १३ हजार २५ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९९ हजार ५६७ जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत करोनामुळे ४ हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे.