लालपरीला मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर नो एन्ट्री

ST Bus
ST Bus

मुंबई : Mumbai

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस (Shivneri Bus) चालवण्यात येणार आहे. एसटीच्या अनेक साध्या बसेस (Lalpari) एक्स्प्रेसवेवरून जात असल्याने त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला (MSRTC) बसत आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून एसटी बसेस धावत नसल्याने जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी भारमान घटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, आता एसटीच्या साध्या बस या जुन्या मार्गावरून चालवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवनेरी वगळता इतर एसटी बसने एक्स्प्रेसवेवरून प्रवास केल्यास त्या दरम्यान ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम चालकाकडून वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

त्याशिवाय, अशा चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीदेखील, एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवली जात होती. मात्र, काही चालक परस्परपणे एक्स्प्रेसवरून एसटी चालवत असे. ही बाब उघडकीस आल्यानंतर एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com