लवकरच हवेतून उडणारी बस, वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट योजना

लवकरच हवेतून उडणारी बस, वाहतूक कोंडीवर नितीन गडकरींनी सांगितली भन्नाट योजना

पुणे (प्रतिनिधि)

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग प्रशासनाने येथील जुना उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे भेटीवर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चांदणी चौकातील कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कोथरूड चे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी विविध विषयांवर माहिती दिली.

“आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.

चाकण एमआयडीसी पासून २७ किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरमध्ये मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली. त्याचवेळी नाशिक फाटा येथे तिहेरी उड्डाण पुलावरून मेट्रो मार्गिकेचे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, की पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून २७ किमी अतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरमध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

पुणे विभागात लॉजिस्टिक पार्कसाठी जी जमीन अधिग्रहण करावे लागते. त्यासाठी NHAI तर्फे मी जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑफर दिली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)च्या बाजूला लॉजिस्टिक पार्कसाठी जर जागा दिल्यास मदत होणार आहे. केंद्रातर्फे दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पुण्याजवळ अशा प्रकारची जागा मिळाल्यास ती या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरले असे गडकरींनी यावेळी सांगितले.

नाशिक फाट्यावर तीन मजली उड्डापुलाचं लक्ष पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली उड्डाण पूल करण्यासाठी विचार चालू आहे. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी. याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग विकसित करण्याचेही काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येणं शक्य होणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. चांदणी चौकातील येत्या दोन ते तीन दिवसांत पाडणार पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत येथील पूल पाडण्यात येईल. वेळेत काम झाल्यास नव्या पुलाचे उद्घाटन लवकर करण्यात येईल. पुण्यातील वाहतूक कोंडीतुन प्रवास गतिमान करण्यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा विचार चालू असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्रॅफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com