नव्या वर्षापासून सरकारी कार्यालयांना बॅटरी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावी लागणार

स्थानिक संस्थांनाही ही वाहने बंधनकारक
नव्या वर्षापासून सरकारी कार्यालयांना बॅटरी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावी लागणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 नुसार इलेक्ट्रिक वाहन खरेदीस प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रिक असावीत, असे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 जाहीर केले आहे. या धोरणात विविध प्रकारची प्रोत्साहने जाहीर करण्यात आली आहेत. त्यात नोंदणी सूटचा समावेश आहे.

याच धोरणाच्या अनुषंगाने शासकीय व निमशासकीय यंत्रणांमार्फत जानेवारी 2020 ते मार्च 2022 या कालवधीत खरेदी कण्यात येणारी वाहने ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहने असणे आवश्यक असल्याने तसा बदल या धोरणात करण्यात आलेला आहे.

- त्वरीत नोंदणी सूटची मर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

- 1 जानेवारी 2022 पासून शासकीय व निमशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत खरेदी करण्यात येणारी वाहने बॅटरी इलेक्ट्रिक वाहने असावीत.

- 1 एप्रिल 2022 पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्वार घेण्यात येणारी सर्व वाहने ही बॅटरी इलेक्ट्रीक असतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com