नाशिक । Nashik

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने त्यांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पवार स्वतः मार्गदर्शन करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

शनिवारी (दि.12)9.30 वाजता जयशंकर बँक्वेट हॉल, औरंगाबाद रोड येथे शरद पवार यांच्या सभेची सुरवात होणार आहे . या ऑनलाईन सभेमध्ये पालकमंत्री छगनराव भुजबळ सहभागी होणार असून ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड यांनी दिली आहे.

पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकासह चाहते वर्ग शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा देतात. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे गर्दी टाळणे महत्वाचे असल्याने सर्वांना हिरमोड होऊ नये याकरिता डिजिटल टेक्नोलॉजीच्या मदतीने हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे.

शरद पवार मुंबई मधून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसोबत ऑनलाईन सभेच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात हि ऑनलाईन सभा सर्वांना दिसणार आहे.

पक्षातील प्रमुख नेते आपापल्या जिल्ह्यात उपस्थित राहून डिजिटल टेक्नोलॉजीच्या मदतीने या ऑनलाइन सभेला संबोधित करणार आहे. भामरे, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, डॉ.अमोल वाजे, बाळासाहेब मते, राकेश मुंडावरे, शंकर पिंगळे, सुरेश आव्हाड, धनंजय रहाणे यांनी केले