
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेल्या पुण्यातील बारामती बाजार समितीचा (Baramati apmc Election) निकाल हाती आला आहे. या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP wins baramati apmc election) यंदाही गड राखला असून १८ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे...
या निवडणूकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत होती. त्यात १८ पैकी १८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. बारामतीत १७ जागांसाठी मतदान झाले होते. तर इंदापूरमध्ये १४, दौंडमध्ये १८, तर नीरामध्ये १६ जागांसाठी मतदान झाले होते. त्यात बारामतीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत १८ जागा काबीज केल्या आहेत.
तर दुसरीकडे मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व असणार याकडे अवघ्या मावळ वासियांचे लक्ष होते. आज अखेर दुपारपर्यंत निकाल हाती आले असून महाविकास आघाडीने मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवल्याचे चित्र पाहायला मिळाले.