अमोल कोल्हेंनी केला एकांतवासाचा उलगडा, पाहा व्हिडिओ

अमोल कोल्हेंनी केला एकांतवासाचा उलगडा, पाहा व्हिडिओ

मुंबई | Mumbai

सोशल मिडीयावर (social media) पोस्ट टाकून गेल्या रविवारपासून चिंतनासाठी एकांतवासात गेलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) खासदार डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांनी एकांतवासाचे गुपित अखेर उलगडलं आहे. त्यांनी व्हिडीओ जारी करत स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. 'सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यात, वर्षात बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवाताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळं जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक. शारिरीक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थाकवा घालण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन,' असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com