चिमुकलीची शिवभक्ती पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल, पाहा VIDEO
नुकताच ६ जून रोजी सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडवर थाटामाटात पार पडला. छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे महाराजांना मानाचा मुजरा दिला.
दरम्यान या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ जोरदार जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चिमुकली दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ही चिमुकली हातात छत्रपतींची मूर्ती घेऊन गडावर जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती मूर्तीला अभिषेक करते आणि नंतर कुंकू लावते. मागे श्रीपती, भूपती, गजपती हा आमचा राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी हे गाणं वाजतंय.
दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडीओ डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील शेअर केला आहे. मच्छे, बेळगाव इथल्या अडीच वर्षीय रुत्वी गजानन जैनोजी या गोड चिमुकलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आवर्जून आपल्याशी शेअर करतोय!, असे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणी ही भारावून जाईल. तसेच या शिवप्रेमामुळे प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल, असेही म्हटले जात आहे.