सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्या लढ्याला यश; लेखी आश्वासन आणि फडणवीसांच्या फोन नंतर आंदोलन स्थगित
सांगली | Sangali
सांगलीमधून (Sangli) एक महत्वाची बातमी समोर आली असून रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी आपले अन्नत्याग उपोषण (MLA Rohit Patil & Sumantai Patil Ended Hunger Strike) मागे घेतले आहे. सावळज आणि इतर ८ गावांचा समावेश टेंभू योजनेत करावा, या मागणीसाठी आमदार रोहित दादा पाटील आणि सुमनताई पाटील उपोषणाला बसल्या होत्या. अखेर सरकारने मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडले आहे.
आश्वासनाप्रमाणे जर एक महिन्यात काम सुरू नाही झाले तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावाच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंबंधित मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचा निर्णय आमदार सुमनताई पाटलांनी जाहीर केले.
दरम्यान, यानंतर रोहित पाटील यांनी उपोषणात सहभागी झालेल्यांचे आभार मानले. तसेच "स्वर्गीय आर. आर. आबा याचे स्वप्न होते या गावांना पाणी मिळाले पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही पाठ पुरावा करत गेलो असे सांगत याबाबत राज्य सरकारने मान्यता दिल्याचे सांगितले आहे.
तसेच या प्रक्रियेला १ महिन्याचा कालावधी लागणार आहे. आपणास विनंती हे उपोषण माघे घ्यावे ही विनंती या पत्राद्वारे केली आहे. आम्ही १ महिन्याचा कालावधी थांबू पण याच्या पेक्षा जास्त वेळ लागेल तर मंत्रालय समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.