राष्ट्रीय खेळाडूचा नाशकात बळी

करोना उपचारादरम्यान आला हृदयविकाराचा झटका
राष्ट्रीय खेळाडूचा नाशकात बळी

सोयगाव - Soygaon :

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात स्थित असलेल्या सोयगाव येथील राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉलखेळाडू सुशील सुनील पाटील याचा अवघ्या 24 व्या वर्षी कोरोना संसर्गाने बळी घेतल्याची खळबळजनक घटनेची वार्ता सोयगावात धडकताच शहरात शोककळ पसरली. उपचारादरम्यान सुशीलला हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

सुशीलला ता.२२ एप्रिलला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते,त्याचा एच.आर.सी.टी स्कोर एक होता.नाशिकला उपचार घेण्याचा विचार केला परंतु बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले.

सुशीलला श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने ओझर मधील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी उपचारांची यंत्रणा अपूर्ण होती.ओक्सिजानाही नव्हता परिणामी ता.२८ अप्रिलला सुशीलला नाशिकच्या एस.एम.बी.टी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ.नीरज मोरे,डॉ,रुचिरा,डॉ,पटेल त्याच्यावर उपचार करत होते डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे महागडी औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

सुशीलला दि.22 एप्रिलला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्याचा एच.आर.सी.टी स्कोर एक होता. नाशिकला बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्याला घरीच उपचार घ्यावे लागले.

घरचा सधन कोटीचा विमा आणि कुटुंबियाची खर्च करण्याची तयारी असूनही केवळ वेळेवर बेड न मिळाल्याने ओझर ते नाशिक धावपळ करावी लागल्याने एका राष्ट्रीय खेळाडूला आयुष्याचा खेळ २४ व्या वर्षी सोडवा लागला.हि खेदाची बाब आहे.

बी.एस.सी अग्रीचा पदवीधर असलेल्या सुशीलला क्रीडा क्षेत्रात चुणूक दाखवून सोयगावचे नाव उंचावर लौकिक करण्याची इच्छा होती,परंतु हि इच्छा अर्ध्या वाटेवरच अपूर्ण राहिली होती.या खेळाडूला वेळेवर बेड मिळाला असता तर चित्र वेगळे राहिले असते असे अजूनही सुशीलच्या कुटुंबियांना वाटत असल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सुशीलला श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने ओझर मधील खासगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी ऑक्सिजान नव्हता. परिणामी दि.28 एप्रिलला सुशीलला नाशिकच्या एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.नीरज मोरे, डॉ.रुचिरा, डॉ.पटेल त्याच्यावर उपचार करत होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महागडी औषधी उपलब्ध करून देण्यात आली. सुशीलच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. परंतु, उपचारादरम्यान त्याला हृदय विकाराचा झटका आल्याने सुशीलचे निधन झाले. घरचा सधन कोटीचा विमा आणि कुटुंबियाची खर्च करण्याची तयारी असूनही केवळ वेळेवर बेड न मिळाल्याने ओझर ते नाशिक धावपळ करावी लागल्याने एका राष्ट्रीय खेळाडूला आयुष्याचा खेळ 24 व्या वर्षी सोडावा लागला. बी.एस.सी. अ‍ॅग्रीचा पदवीधर असलेल्या सुशीलला क्रीडा क्षेत्रात चुणूक दाखवून सोयगावचे नाव उंचावर लौकिक करण्याची इच्छा होती, परंतु हि इच्छा अर्ध्या वाटेवरच अपूर्ण राहिली होती. वेळेवर बेड मिळाला असता तर सुशील वाचला असता अशी खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली. कोरोना संसार्गात राज्य शासनाला गांभीर्य नसल्याचे भावना सुशीलचे काका सोयगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश पाटील यांनी व्यक्त केली.

इंजेक्शनच्या साठ्यासाठी खासगी रुग्णालयांची लॉबिंग

सरकारी यंत्रणेच्या कमजोरीमुळे सुशील सारख्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.रेमडेसिव्हीर व टोसिलीझुम्ब इंजेक्शनचा राज्यभर काळाबाजार सुरू आहे. याकडे शासन पातळीवरून लक्ष नसून रेमडेसिवीर 25 हजार आणि टोसिलीझुम्ब दोन ते अडीच लाख रुपये देऊन घ्यावे लागत आहे. सुशीलच्या उपचारासाठी धावपळ करतांना हा अनुभव घेतला, असे योगेश पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com