नाशिक विभागातील तलाठ्यांच्या दप्तराची होणार तपासणी

नाशिक विभागातील तलाठ्यांच्या दप्तराची होणार तपासणी

महसूल प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक महसूल विभागातील (Nashik Revenue Department) नाशिक (Nashik), नगर (Ahmednagar), जळगाव (Jalgav), धुळे (Dhule) आणि नंदूबार (Nandurbar) या पाचही जिल्ह्यातील तलाठी (Talathi) यांच्या दप्तरांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी दिले आहेत. नाशिक विभागातील (Nashik Division) पाच जिल्ह्यात 2063 तलाठी आहेत. येत्या तीन महिन्यांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दप्तर तपासणीच्या कामासाठी एक ऑप तयार करण्यात येणार आहे. त्याव्दारे या तपासणीचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

महसूल विभाग (Department of Revenue) हा प्रशासनाचा महत्वाचा कणा असून जमीन विषयक सर्व प्रकारची कागदपत्रे सांभाळणारे व अद्ययावत करण्याची जबाबदारी असलेल्या तलाठी कार्यालयाशी सर्व सामान्य जनतेचा नेहमी संबंध येत असतो. तलाठी दप्तरामध्ये सामान्य शेतकर्‍यांचे 7/12 उतारा, फेरफार यासह सरकारी जमीन इनाम व वतन जमीनी यांच्या नोंदी यासारखे अनेक अभिलेखे असतात. तलाठी दप्तराची वेळेवर तपासणी होऊन त्यामधील त्रुटींवर वेळेत कार्यवाही झाली तर गाव पातळी वरील अनेक प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होऊ शकते व पुर्णत: वाद-विवाद व कनिष्ठ न्यायालयातील दावे कमी होतील.

नाशिक विभागातील (Nashik Division) पाच जिल्हयात 2063 तलाठी आहेत. नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) 583 तलाठी, नाशिक (Nashik) 532, नंदुरबार जिल्हयात (Nandurbar District) 222, धुळे (Dhule) 225 तर जळगाव (Jalgav) 501 तलाठी आहेत. या सर्व तलाठी कार्यालयांच्या दप्तराची तपासणी (Inspection of Talathi offices) करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून पुढील तीन महिन्यांत ही कार्यवाही पूर्ण केली जाईल. तलाठी दप्तरांची तपासणी करण्याचे सविस्तर आदेश विभागीय आयुक्तांनी नुकतेच जारी केले असून सखोल दप्तर तपासणी कशा पध्दतीने करावयाची याबाबत महसूल अधिकार्‍यांची कार्यशाळाही नुकतीच घेण्यात आली.

तलाठी दप्तर तपासणीमध्ये पिक पाहणी, 7/12 संगणकीकरण यासारख्या बाबींचीही छानणी केली जाईल. दप्तर तपासणीमध्ये विविध गाव नमुने, प्रलंबित फेरफार, सरकारी, वतन व इनाम जमीनींची नोंद यासह अनेक बाबींची तपासणी केली जाईल. नाशिक विभागातील पाचही जिल्हयातील सर्व प्रांत अधिकारी व तहसिलदार यांचे सह जिल्हयातील इतर वरीष्ठ अधिकारी यांचेकडून तलाठी दप्तराची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये आढळणार्‍या त्रुटींची तातडीने पूर्तता करुन घेऊन सरकारी अभिलेखे अद्ययावत करण्यात येण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी दप्तर तपासणीमुळे सामान्य शेतकरी व नागरीकांच्या जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कुठल्याही सबळ कारणाशिवाय फेरफार आणि जमीन विषयक कामे प्रलंबित राहू नये, याकडे या तपासणीमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दप्तर तपासणीच्या कामासाठी एक ऑप तयार करण्यात येणार असून त्याव्दारे या कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. तलाठी दप्तर तपासणीमुळे महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येऊन महसूल विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.