मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
महाराष्ट्र

न्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करा

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

मागील सरकारने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. आता महाविकास आघाडिने सर्वोच्च न्यायालयात मराठा अारक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा समन्वय समितीकडून करण्यात आली. गुरुवारी (दि.६) या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा स्विकारला असून पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मराठा आरक्षणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे. समाजाने आवाज उठविल्यानंतर मंत्री मंडळ उपसमितीचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले.

त्यानंतर चव्हाण यांनी व्हिसी द्वारे बैठका घेतल्या. या सरकारने न्यायालयात आरक्षण टिकवावे यासाठी भक्कमपणे बाजू मांडावी. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले जाईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. समितीचे निमंत्रक करण गायकर, गणेश कदम, रवींद्र पाटिल आदिंनी निवेदन दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com