९६ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

९६ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

मुंबई | Mumbai

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) बैठक आज मंगळवारी वर्धा येथे पार पाडली.

या बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची एकमताने निवड करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे अशी मागणी समोर आली होती. त्यानंतर वर्धा येथे संमेलन होणार आहे.

ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत सुरेश द्वादशीवार आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यामध्ये संमेलनाध्यक्षपदीसाठी चुरस होती. पण आज नरेंद्र चपळगावकर यांची ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि प्रसिद्ध लेखक नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध वक्ते असून, त्यांनी चरित्र - आत्मचरित्रांबरोबरच विविध वैचारिक ग्रंथांचे लेखन केलेले आहे. तसेच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com