नारायण राणेंनी मानले ‘या’ चार नेत्यांचे आभार

नारायण राणेंनी मानले ‘या’ चार नेत्यांचे आभार
नारायण राणे

नवी दिल्ली / New Delhi - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. राष्ट्रपती भवनात 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे.

दरम्यान, नारायण राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी चार व्यक्तींचे प्रामुख्याने आभार मानले असून त्यांचे ऋणी असल्याचे सांगितले आहे.

आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज मंत्री बनलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जबाबदारी देतील, ती मी संभाळेन, असे राणे यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज्ञेप्रमाणे काम करू, असं देखील राणेंनी यावेळी म्हणाले. सुरुवातीला मुंबई पालिकेत 1985मध्ये नगरसेवक झालो. मग बेस्टमध्ये चेअरमन झालो. मग आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा आमदार, खासदार आणि आता मंत्रीपदाची शपथ घेतोय याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी, अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आहे. त्यांचा मी ऋणी आहे. मोदी देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करीन. महाराष्ट्राला मंत्रीपद मिळाल्याने महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी मी काम करीन, असे राणेंनी नमूद केले.

म्हणून माझा पहिला नंबर लागला

मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये नारायण राणेंनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्याविषयी देखील राणेंनी यावेळी कारण सांगितलं. ज्येष्ठतेनुसार ही व्यवस्था लावण्यात आली होती. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो आहे. 7 टर्म मी आमदार राहिलो आहे. त्यासाठीच माझा पहिला नंबर लागला, असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com