औरंगपूर येथे चोरी : दोन लाखांचा ऐवज लंपास
महाराष्ट्र

औरंगपूर येथे चोरी : दोन लाखांचा ऐवज लंपास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहादा । ता.प्र.

शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील शेतकर्‍याच्या घरातून चोरट्यांनी सुमारे 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.या चोरीमुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,औरंगपूर ता.शहादा येथील शेतकरी नामदेव गोविंदा पाटील यांच्या राहत्या घराचे धाब्यावरील दरवाज्याचे दार उघडून चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्याचे कुलूप तोडले.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरात ठेवलेल्या कपाटातून 90 हजार रुपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या बांगड्यांची जोडी, 54 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन , 48 हजार रुपये रोख असा 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी नामदेव गोविंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरध्द भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सेपानि भदाणे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com