गावितांसोबत युतीचा प्रश्नच नाही – रघुवंशी
महाराष्ट्र

गावितांसोबत युतीचा प्रश्नच नाही – रघुवंशी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार  – 

विधानसभा निवडणुकीप्रसंगी भाजपा आणि शिवसेनेची युती होती. आता शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्यासोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथील संजय टाऊन हॉल मध्ये माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.  या मेळाव्यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, दैनिक देशदूतच्यां  दि. 8 डिसेंबर रोजीच्या अंकात राज्यात भाजपा सेनेची युती संपुष्टात, गावित रघुवंशी यांच्या युतीचे काय? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची जिल्हाभर चर्चा झाली.

या वृत्ताबाबत मेळाव्यात बोलताना माजी आ. चंद्रकांत रघुवंशी म्हणालेझ विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होती.  युती धर्मानुसार मी त डॉ. गवितांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे.

राज्यात  शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आता गावितांसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही.

जिल्हा परिषद निवडणुकीत तीनही पक्ष एकत्रित लढणार आहेत. लवकरच तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही श्री.रघुवंशी यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com