सरकार कुठपर्यंत मदत करणार ? - नाना पाटेकर

काही गलिच्छ डॉक्टर मंडळी पेशाला काळिमा
सरकार कुठपर्यंत मदत करणार ? - नाना पाटेकर

पुणे |प्रतिनिधि| Pune

राज्यातील वाढलेले करोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.

राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकार करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला विरोधही केला जात आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी सरकारने काही जबाबदारी घ्यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. याबाबत जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार कुठपर्यंत मदत करणार? सरकारला एक मर्यादा आहेत असे मत व्यक्त केले आहे.

वाढत्या करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासह सर्वांनी नियमांचं पालन केले पाहिजे. लॉकडाउन करण्यात कोणत्याही सरकारला आनंद वाटत असेल का? असा सवाल करत मी कोणत्याही पक्षाचा नाही, पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे, असेल तर हे गरजेचं आहे,” असंही ते म्हणाले.

करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ, नाम फाउंडेशन यांच्यासह काही जणांनी एकत्रित येत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं.त्यावेळी ते बोलत होते.

पाटेकर म्हणाले, सरकार त्यांच्या परीने मदत करतच राहणार आहेत. पण आपण सर्वांनी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाने १०० लोकांची नव्हे, तर एक-दोन अशा लोकांची जबाबदारी घेण्यासाठी या कठीण काळात पुढं आलं पाहिजे. आपण स्वतःला नशीबवान समजले पाहिजे की, अशा कठीण काळात कोणासाठी तरी काही करू शकतो.”

काही गलिच्छ डॉक्टर मंडळी पेशाला काळिमा

दरम्यान, रक्तदान शिबिर कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी काही गलिच्छ डॉक्टर मंडळींनी पेशाला काळिमा फासळी आहे. रक्ताचा काळाबाजार होत असून, आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे असे आवाहन केले. आजच्या तरुण पिढीला सांगितले, तर ते लगेच ऐकतात, पण दुसर्‍या बाजूला काही मंडळी त्यांना दूषणं देत असतात. या पिढीला काही कळत नाही. ते कसंही वागतात. माझं अशा व्यक्तींच्याविरुद्ध मतं असून, आजच्या एवढी तरुण पिढी कोणतीच सजग नव्हती,” अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com