नागपूर -

नागापूरात एका महिलेवर पेट्रोल टाकून भर चौकात जिवंत जाळण्यात आले आहे. ही थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी सदरमधील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेज जवळील

हल्दिरामसमोर घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

शबाना अब्दुल जावेद (वय 40 रा. महेंद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम आटोपून शबाना या मोपेडने घरी जात होत्या. सदरमधील हल्दिरामसमोर एका तरुणीसोबत तरुण वाद घालत असल्याचे शबाना यांना दिसले. त्यांनी मोपेड थांबवली. त्या तरुणाला समाजविण्यासाठी गेल्या. समजावित असतानाच तरुण संतापला. त्याने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. माचिसची काडी उगारून त्यांच्या अंगावर फेकली. त्यानंतर तरुण तरुणीला घेऊन मोटरसायकलने पसार झाला. शबाना यांना जळताना बघून नागरिकांनी धाव घेतली. पाणी टाकून आग विझवली. नागरिकांनी शबाना यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.