नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होणार; मोजावे लागणार 'इतके' रूपये

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होणार; मोजावे लागणार 'इतके' रूपये
File Photo

नागपूर (Nagpur)

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी लांबीचा मार्ग डिसेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. तर पुढील वर्षी २०२२ मध्ये ७०० किमीचा संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे.

मात्र या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालक आणि प्रवाशांना टोलपोटी १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर एकेरी प्रवास करायचा असेल तर १,१५७ रुपये मोजावे लागणार आहेत. तर नागपूर ते शिर्डी प्रवासासाठी अंदाजे ८३० रूपये मोजावे लागणार आहेत.

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने टोलचे दर जाहीर केले आहेत. समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी केली माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

'समृद्धी' श्रीमंतांसाठी ? मुंबई-नागपूर

७०० किलोमीटर प्रवासासाठी ११५७ रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. रेल्वेच्या सेकंड स्लीपर कोचचं भाडं ५०० रुपये आहे. विमानाचं तिकीट ३५०० ते ४००० हजार रुपये आहे. टोल आणि कारच्या इंधनाची गोळाबेरीज केल्यास विमानाचा प्रवास स्वस्त ठरतोय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com