माझी आयुष्यात एकच इच्छा आहे, पेट्रोल-डिझेल बंद करणं - नितीन गडकरी

माझी आयुष्यात एकच इच्छा आहे, पेट्रोल-डिझेल बंद करणं - नितीन गडकरी
नितीन गडकरी

पुणे(प्रतिनिधि)

‘साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली तर गाड्या चालतील, प्रदूषण बंद होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. इथेनॉलसाठी मी पंतप्रधानांना विनंती केली,त्यांनी तीन पंप पुण्यात दिले. माझा ट्रॅक्टर सीएनजीवर आहे, १ लाख रुपये वर्षाला वाचवतोय’, माझी आयुष्यात एकच इच्छा आहे, पेट्रोल-डिझेल बंद करणं… शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पुण्यात आज सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचं भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

गडकरी म्हणाले, ‘माझी आयुष्यात एकच इच्छा, पेट्रोल-डिझेल बंद करणं, शेतकरी ही माझी इच्छा पूर्ण करु शकतात. मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका, मी तुमचं काम करणार नाही. त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं., ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे. आता रशियातून टेक्नॉलॉजी आणली आहे, १ लि. पेट्रोल बरोबर १ लि इथेनॉल’.

‘मी राजीव बजाजला बोलावतो, पुण्यातील ऑटो, बाईक, मी तीन चार महिन्यात ऑर्डर काढतोय, बीएमडब्यू पासून मर्सिडीज, टाटा महिंद्रा सर्वांना फ्लेक्स इंजिन पेट्रोलचं बनवावं लागेल, ज्यात शंभर टक्के इथेनॉल, शंभर टक्के पेट्रोल हा पर्याय ठेवावा लागेल.’

तर नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल..

‘मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी माझं इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही’, असं नितीन गडकरी म्हणाले.

‘आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील काम राहिलं आहे. जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा’, असं आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केलं.

‘पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं.’

पुणे या चार शहरांशी मेट्रोने जोडता येईल तेही फक्त एक कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्चात

गडकरींनी पुणे शहरातून 4 शहरांसाठी ब्रॉडगेज मेट्रोची संकल्पणा बोलून दाखवली. ते म्हणाले, नागपूर मेट्रोची निर्माण किंमत 350 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे तर पुणे मेट्रोची निर्माण किंमत 380 कोटी रुपये प्रति किलोमीटर , पण एक नवीन मेट्रोची संकल्पना आहे. ह्या मेट्रोची निर्माण किंमत फक्त एक कोटी प्रती किलोमीटर अशी राहील. मी कन्सलटंन्ट म्हणून फुकट काम करायला तयार आहे.

ही मेट्रो सध्याच्या ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर धावेल आणि यासाठी भारतीय रेल्वेसोबत मीटिंग सुद्धा झाली आहे. आम्ही हा प्रकल्प नागपूर परिसरात सुरु करणार आहोत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील आपण सुरु करु शकतो. पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापुर, पुणे ते अहमदनगर , पुणे ते सोलापुर अशी ही नवीन मेट्रो सुरु होउ शकते. या मेट्रोमध्ये 6 अत्याधुनिक कोच असतील आणि दोन कोच विमानासारखे असतील, असंही गडकरींनी सांगितलं.

पुणे आणि नागपूर मेट्रोविषयी नेहमी तुलना होत असते. यावरही गडकरींनी भाष्य केलं. ते म्हणाले, “पुणे मेट्रोपेक्षा नागपूर मेट्रोचं काम वेगाने सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं, यावरुन माझ्यावर आणि देंवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली. पण खरं सांगतो पुणे मेट्रोच्या कामाबाबत जरा गुंतागुंत होती. अंडर ग्राऊंड मेट्रो करायची की वरुन जाणारी मेट्रो करायची, याबाबत एकमत होत नव्हतं. मात्र नागपूर मेट्रोबाबत, असं काही नव्हतं. त्याचमुळे नागपूर मेट्रोचं काम लवकर सुरु झालं आणि ते पूर्वत्वासही गेलं”

नितीन गडकरी म्हणाले, “पुण्याच्या मेट्रोचं काम सुरु झालं नव्हतं आणि नागपूर मेट्रोचं काम वेगाने होत होतं. त्यावेळी मला आठवत पुण्यातल्या वर्तमान पत्रांनी माझ्यावर आणि देवेंद्रवर खुप टीका केली होती. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो, त्यावेळी पवार साहेबांबरोबर एक मिटिंग झाली. त्यावेळी मी ठरवलं की जेवढा आपण खर्च जास्त करु, तेवढा तिकीटाचा दर जास्त होईल. त्यामुळे जेवढं अंडरग्राऊंड टनेलिंग जास्त करु, तेवढा खर्च वाढणार आहे. त्याचवेळी आम्ही पुणे मेट्रोच्या कामाची दिशा ठरवली आणि पुणे मेट्रोचं काम सुरु झालं. आज आनंद वाटतो, पुण्यामध्ये मेट्रोचं काम अतिशय गतीने सुरु झालं आहे”.

Related Stories

No stories found.