पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन
महाराष्ट्र

पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन

जुन्नरमधील गायमुख वाडी येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील गायमुख वाडी येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1980 ते 90 च्या दशकात बाबा शिंगोटे यांचा वृत्तपत्र वितरण क्षेत्रात दबदबा होता. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.Murlidhar Shingote Passes Away

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते.

वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com