
नागपूर | Nagpur
नागपूरमधून एक धक्कादायक वृत्त हाती येत आहे. महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang rape) करुन तिच्या हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यानंतर महिलेच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी गावात तिघा नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
सिद्धार्थ पाटील, अबू उर्फ दिनेश उईके आणि नंदकिशोर उईके अशी संशयितांची नावे आहेत. मृत महिला ही कापूस वेचणारी मजुर महिला आहे. या महिलेचा पती आणि संशयितांमध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठीच संशयितांनी महिलेसोबत असे केल्याची केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मृत महिला शेतात एकटीच कापूस वेचत असताना तीन संशयित तेथे पोहचले. या महिलेला एकटीला पाहून तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या महिलेने स्वत:ला नराधमांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, नराधमांनी या महिलेवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर एका नराधमाने महिलेच्या मृतदेहावरच बलात्कार केला. ग्रामस्थांना या महिलेचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आता पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.