युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले...

युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले...

मुंबई | Mumbai

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) सिनेट निवडणुका (Senate Elections) रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून १८ तारखेपासून सिनेट निवडणुकीसाठी अर्ज भरायचे होते. परंतु १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री उशीरा विद्यापीठाने पत्रक काढून निवडणुकीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केल्याने विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यसह इतर संघटनांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबई विद्यापीठ निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज युवासेनेने १० जागेवर अर्ज दाखल केले.“गेल्यावेळी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही १० पैकी १० जागांवर जिंकलो. यावेळी सुद्धा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या युवासेनेचे पॅनलल लढेल आणि परत एखदा सर्व जागा आम्ही जिंकू”, असे वरुण सरदेसाई म्हणाले.

युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले...
आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का! 'या' खेळाडूवर चार वर्षांची बंदी, होती पदकाची आशा

वरुण सरदेसाई पुढे बोलले की, आमच्याकडे १० अर्ज फी सकट भरलेले आहेत. निवडणुका येत्या १० तारखेला होतील ही अपेक्षा आहे. काल रात्री परिपत्रक काढले आणि आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यापीठ कमी पण हाय सेक्युरिटी सेंटर जास्त वाटत आहे. आम्हांला लक्षात आले की, आशिष शेलार यांनी एक पत्र दिले आणि निवडणुका थांबवल्या. काही नावांच्या दुबार नोंदणीचे हे पत्र असल्याचे वरुण यांनी सांगितले.

युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले...
Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-3 च्या कॅमेऱ्यात अवकाशातील अद्भूत नजारा कैद; पहा चंद्र नेमका कसा दिसतो

दरम्यान, विद्यापीठाने चर्चेत अंतिम यादीत बिघाड नाही असे म्हटले आहे. आता शासन आणि विद्यापीठ यांच्यातील ही बाब आहे. अनेक संघटना या निवडणुकीत इच्छुक होते. प्रचंड गोंधळ हा एका पत्रामुळे झाला आहे. आज आम्ही १० अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा कधीही निवडणूक जाहीर होईल तेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि १० जागा जिंकू.

युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले...
CAG Report 2023: नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल; काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

जर निवडणूक वेळेवर झाली नाही तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊ जनतेला संबोधले पाहिजे. निवडणूक स्थगित करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असेही युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com