
मुंबई | Mumbai
मुंबईतील वांद्रे परिसरातील नर्गिस दत्त रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग लेव्हल 2 स्वरूपाची असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या घटनेत दोघे जखमी झाले कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.