..अन्यथा Valentine's Day पडेल महागात !

मुंबई पोलिसांनी केले हे आवाहन
..अन्यथा Valentine's Day पडेल महागात !

मुंबई | Mumbai

व्हॅलेंटाईन डे तरुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस. फेब्रुवारी महिना आला की, व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू होतो. अनेक जण 'व्हॅलेंटाईन डे'साठी मोठी तयारीही करतात.

या दिवसांत 'व्हॅलेंटाईन डे ऑफर'च्या अनेक ऑफर देणारे मेसेज आपल्याला येतात. मात्र 'व्हॅलेंटाईन डे ऑफर'च्या नावाखाली एका लिंकद्वारे लोकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.

ठाणे शहर पोलिसांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ठाणे शहर पोलिसांनी ट्विट सोबत काही फोटोज् जोडले आहेत. यात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ताज हॉटेल गिफ्ट कार्ड असं लिहून एक लिंक जोडली आहे. त्यात सात दिवस मोफत ताज हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाल्याचं म्हटलंय. प्रश्न-उत्तरांच्या स्पर्धेत सहभागी होऊन मोबाईल फोन जिंकण्याची संधी असल्याचा मेसेजही एका लिंकसह देण्यात आला आहे. परंतु या लिंक, या स्किम खोट्या, बनावट असून अशाप्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. यामुळे अनेकांना लुबाडले गेले आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांकडूनही याची दखल घेतली जात आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com