करोना रुग्ण संख्येत मुंबईने चीनला टाकले मागे

मुंबईतील करोनाबळींची संख्या 4 हजार 938
Corona
Corona

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने करोना रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले आहे. चीनमधील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 85 हजार 320 आहे, तर मुंबईत ही संख्या 85 हजार 724 झाली आहे. चीनमध्ये 4 हजार 648 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील करोनाबळींची संख्या 4 हजार 938 आहे.

करोनाला रोखण्यासाठी देशात आणि मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परंतु त्यानंतरही भारतात आणि मुंबईत करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ इतकी मोठी आहे की करोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे मुंबईने करोनाग्रस्तांच्या संख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये आता केवळ 500 ते 600 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत, तर मुंबईत 23 हजार 624 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. भारतात अवघ्या 5 दिवसांमध्ये करोनाचे 1 लाख नवे रुग्ण वाढले. त्यात सलग 3 दिवस दररोज 20 हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 7 लाख 19 हजार 665 असून 4 लाख 39 हजार 948 जण करोनामुक्त झाले आहेत. 20 हजार 160 जणांचा करोनाने बळी घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com