Mumbai Rain : पावसाचा कहर ! मुंबईत पावसाने घेतले २२ बळी

Mumbai Rain : पावसाचा कहर ! मुंबईत पावसाने घेतले २२ बळी

मुंबई | Mumbai

मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसायला सुरुवात झाली आहे. चेंबूर परिसरातील माहुल भागात एका बैठ्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारत नगर, वंजार दांडा भागात ही घटना घडली आहे. मुंबईतल्या पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे.चेंबूर परिसरात १७ आणि विक्रोळीत ५ जणांचा जीव गेला आहे.

सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान या घटनेबद्दलची माहिती मिळताच, अग्नीशमन दल आणि NDRF ची टीम घटनास्थळी पोहचली. यात जखमी झालेल्या १९ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. परंतू या घटनेनंतर मुंबईतील दरड क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने रविवारीही मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या १२ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात एकाच दिवसात इतका पाऊस झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com