Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले

Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

ड्रग्ज माफिया (Drug Mafia) आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झालेल्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) तामिळनाडू येथून अटक केली होती. त्यानंतर आज ललित पाटीलला अंधेरी सेशन्स कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कोर्टात हजर करण्याअगोदर ललित पाटीलने माध्यमांना "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं. यात कुणाकुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावं सांगणार आहे," अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे...

Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले
Maharashtra Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 'इतक्या' दिवसांची पोलीस कोठडी

यावेळी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की, "याबद्दल भारतीय दंड विधान कलम २२४ नुसार ललित पाटीलवर एक स्वतंत्र गुन्हा पुण्यात दाखल आहे. पुणे पोलीस त्यांच्या तपासात या दृष्टीने काम करत असतील. या प्रकरणात अनेक सत्ताधारी नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तसेच या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही होत आहे. याबाबत विचारले असता पोलीस म्हणाले की, "आमचं प्रकरण अमली पदार्थांबाबत आहे. आम्ही अमली पदार्थांचे मोठं रॅकेट उध्वस्त केले आहे. आम्ही अंमली पदार्थांची फॅक्टरी चालवणाऱ्यांबाबत तपास करत आहोत," असे त्यांनी म्हटले.

Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले
Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

तसेच "ड्रग्जचं उत्पादन आणि त्यांचा पुरवठा यात दोघांचाच सहभाग होता. तो सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच आम्ही पाठपुरावा करून ललित पाटीलला अटक केली. आतापर्यंत याप्रकरणी आम्ही १४ जणांना अटक केली आहे. सकाळी ललित पाटीलला अटक केली आहे," अशी माहितीही मुंबई पोलिसांनी दिली.

Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले
Political Special : राजकीयदृष्ट्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक होतंय 'बारामती'; नेत्यांचे सतत दौरे, घडामोडींना वेग

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांकडून नाशिक ड्रग्ज प्रकरणात १४ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र ललित पाटील चकवा देऊन फरार झाला होता. या प्रकरणात ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या धाडीनंतर मुंबई पोलीस, नाशिक पोलीस आणि पुणे पोलीस ललित पाटीलच्या मागावर होते. त्यानंतर आज तामिळनाडूमधून त्याला अटक करण्यात आली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Drug Case : "मी पळालो नाही, तर मला पळवलं गेलं"; ललित पाटीलच्या वक्तव्यावर मुंबई पोलीस स्पष्टच बोलले
Rohit Pawar : "अजितदादांवरील आरोपामागे..."; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com