मुंबईच्या महापौर रुग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर रुग्णालयात दाखल

मुंबई / Mumbai - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच त्यांना त्रास जाणवत होता. आज त्रास वाढल्याने त्यांना परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असून डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com