VIDEO : मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला

VIDEO : मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला

दिल्ली | Delhi

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाव (Mumbai airport) एक मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांनी भरलेल्या विमानाला (plan) पुशबॅक (pushback tug) करण्यास आलेल्या वाहनाला विमानजवळच भीषण आग (fire) लागली.

६५७ क्रमांकाचे हे विमान मुंबईवरून जामनगरला निघाले होते. विमानाला रणवेवर ढकलण्यासाठी पुशबॅक वाहन विमानाला जोडण्यात येत होते. त्यावेळी अचानक विमानाजवळच या पुशबॅक वाहनाने पेट घेतला.

ही घटना घडताच शेजारीच असणाऱ्या एका दुसऱ्या पुशबॅक वाहनाने विमानाला आगीपासून दूर करण्यात आले. त्यानंतर विमानतळावरील अग्निशमन यंत्रणांच्या सहाय्याने पेटलेल्या वाहनाची आग विझवण्यात आली.

ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचवेळी आगीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, या घटनेत कोणलाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, आग नेमकी कोणत्या कारणामुंळे लागली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही आग लवकर आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com