मुंबईत मुसळधार पाऊस
महाराष्ट्र

मुंबईत मुसळधार पाऊस

हायअलर्ट! 9 तासांतच 229 मिमी पाऊस

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. Mumbai Rains वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या 9 तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे. extremely heavy rainfall for the Mumbai

पुढील तीन तासात मुसळधार अति मुसळधार पाऊस पडेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या तुफान पावसाने अजूनही उघडीप घेतलेली नाही, त्यामुळे मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत पाणी तुंबायला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने मुंबईची दुरवस्था झाली आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस सुरू असून भायखळ्यासह अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडसह कोकणातील अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला असून यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com