परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

दोन जणांना अटक
परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
परमबीर सिंग

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Case Of extortion Registered) दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक ही केली आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये श्याम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, डीएसपी अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com