मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह

अत्याचारानंतर हत्येचा संशय; सुरक्षा रक्षकाची आत्महत्या.... गूढ वाढले
मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह

मुंबई | Mumbai

वसतिगृहाच्या खोलीत एका विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थतेतील मृतदेह सापडल्याने मुंबईत (Mumbai crime news) खळबळ उडाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील शासकीय वसतिगृहात मंगळवारी (६ जून) रात्री ही घटना घडली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वसतिगृहातील राहत्या खोलीत मुलीचा मृतदेह मंगळवारी विवस्त्र अवस्थेमध्ये सापडला आहे. पिडीत मुलगी मूळची अकोल्याची असून बांद्रातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मुंबईत आली होती. जवळपास मंगळवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घटना उघडकीस होताच मरीन ड्राईव्ह पोलिसाना सांगण्यात आले. त्वरित पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले . मुंबईहून दोन दिवसानंतर आपल्या घरी जाण्यासाठी पिडीत मुलगी तयारीत असल्याची माहिती मिळत आहे .

मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह
काजवा महोत्सव पाहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा भीषण अपघात, महिलेचा मृत्यू

दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याचे नंतर समोर आले. ओमप्रकाश कनोजिया असं त्याचं नाव असून, तो सकाळपासून गायब होता. सकाळी ६ वाजताच्या सुमारास या सुरक्षारक्षकाने ग्रँट रोड ते चर्नी रोड स्थानकादरम्यान लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मयत सुरक्षारक्षक मागील १५ वर्षांपासून काम करत होता. तो पहाटे तीन वाजता चौथ्या मजल्यावर गेला आणि तासाभराने बाहेर पडला, असं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा मृतदेहच पोलिसांच्या हाती लागला.

मुंबईत खळबळ! विद्यार्थिनीचा वसतिगृहात सापडला विवस्त्र मृतदेह
NCP : राष्ट्रवादीचा नगर येथील ९ जूनचा मेळावा पुढे ढकलला, कारण काय?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com