गौतम अदानींनंतर अनंत अंबानी रात्री उशिरा 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा

गौतम अदानींनंतर अनंत अंबानी रात्री उशिरा 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा

मुंबई | Mumbai

उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनीही मातोश्रीवर जावून उद्धव यांची भेट घेतली आहे.

या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रात्री ८.२० च्या सुमारास अनंत अंबानी ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. त्यानंतर ११.३० च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चां झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

दरम्यान, ही भेट घडत असतानाच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर होते. यावेळी महायुतीच्या चर्चाही रंगल्या होत्या. ही भेट राज्याच्या राजकारणातली महत्त्वाची भेट मानली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आता अदानींपाठोपाठ अंबानींचीही भेट घेतल्याने या दोघांमध्ये नक्की काय शिजतंय याकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com