म्युकरमायकोसिसचे 7000 चे इंजेक्शन आता 1200 रुपयात मिळणार

म्युकरमायकोसिसचे 7000 चे इंजेक्शन आता 1200 रुपयात मिळणार

नागपूर :

राज्यासह देशावर कोरोनाचे संकट असताना म्युकरमायकोसिसची भर पडली. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. या आजारावरील औषध उपलब्ध होत नसल्याने समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नाने वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. या आजारावरील उपचारासाठी वापरले जाणारे Amphotericin B Emulsion इंजेक्शन बाजारात 7000 रुपयात मिळत होते. आता हे इंजेक्शन 1200 रुपयात उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे इंजेक्शन त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी लॉन्च केले. देशात एम्फोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाइफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे.ता.

म्युकरमायकोसिसचे 7000 चे इंजेक्शन आता 1200 रुपयात मिळणार
...तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

जेनटेक लाइफ सायन्सची दररोज तब्बल 20,000 वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे. सध्या बाजारात Amphotericin B Emulsion इंजेक्शनची कमतरता आहे. एका इंजेक्शनसाठी 7 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत 1200 रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.

नितीन गडकरी यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. योगायोगाने आजच त्यांच्या कार्यालयाकडून जेनेटेक लाईफ सायन्सेसकडून तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनची निर्मितीची माहिती देण्यात आली. या कंपनीला इंजेक्शनचे उत्पादन करता यावे यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला हो

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com