लालपरी आली ट्विटरवर...
महाराष्ट्र

लालपरी आली ट्विटरवर...

परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांची घोषणा

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

संपूर्ण महाराष्ट्र फिरणारी लालपरी अर्थात एस.टी आपली कात टाकत सोशल मीडियावर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडल आज प्रसिद्ध करण्यात आले. राज्याचे परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, " महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडल आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. इथून पुढे एसटी महामंडळचे सर्व अपडेट्स या ट्विटर हॅन्डल्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्यात येतील.

एसटी महामंडळचे अधिकृत ट्विटर हॅंडल : - @msrtcofficial"

लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील अनेक कामगारांना त्यांच्या राज्यात पोचविण्याची महत्वाची जबाबदारी परिवहन मंडळाने पार पाडली होती. तसेच राज्यातील अनेक काना-कोपऱ्यात जाणारी बस आता ट्विटर आल्यामुळे नक्की प्रवाशांना मदत होणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com