MPSC कडून बंपर भरती! तब्बल ८,१६९ पदासाठी निघाली जाहिरात

MPSC कडून बंपर भरती! तब्बल ८,१६९ पदासाठी निघाली जाहिरात

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ची जाहिरात एमपीएससीने शुक्रवारी प्रसिद्ध केली. (MPSC Recruitment 2023)

एमपीएससी अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारीची ७८, राज्य कर निरीक्षकची १५९, पोलीस उप निरीक्षकची ३७४, दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) ४९, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)ची ६, तांत्रिक सहाय्यकचे १, कर सहाय्यकची ४६८ आणि लिपिक टंकलेखकची ७०३४ पदे भरली जाणार आहेत.

ही परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी राज्यातील एकूण ३६ परीक्षा केंद्रावर होणार आहे. गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com