इंदापूर | Indapur
करोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 15 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी आता पर्यंत सुमारे 8 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु देखील झाली आहे. तसेच राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती इंदापुरात एका कार्यक्रमात सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणार्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्याप्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. असा संदेश स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिला.
करोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. आता पर्यतच्या इतिहासात राज्याने भरतीच्या 300 जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जातील. असे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिले.