राज्यसेवा पूर्व परीक्षा 'या' तारखेला होणार

राज्यसेवा पूर्व परीक्षा 'या' तारखेला होणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा , दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- २०२० या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुन्हा जारी करण्यात आले आहे.

आता नव्या वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Prelims Exam) ११ ऑक्टोबर २०२०, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२२ नोव्हेंबर २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहेत.

दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यापूर्वीच्या २० सप्टेंबरला होतील असे सांगण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/ मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. आता एमपीएससीने जारी केलेले राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०२० बाबतचे नवे वेळापत्रक एमपीएससीच्या www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संपूर्ण देशात नीट परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडत आहे. त्या दिवशीच एमपीएससीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही परीक्षा एकत्र असल्याने ती २० सप्टेंबरला होणार होती. मात्र ते देखील रद्द झालं होतं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com