'MPSC'कडून विक्रमी वेळेत निकाल

'MPSC'कडून विक्रमी वेळेत निकाल
MPSC Logo MPSC Logo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता.२९) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाने आतापर्यंत सर्वात जलद निकाल लावला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये (Students) आयोगाच्या कार्यप्रणालीवर विश्वास वाढला आहे. १८ एप्रिल ते २९ एप्रिल या दरम्यान ही मुलाखत प्रक्रिया झाली होती. ही प्रक्रिया आटोपल्‍यानंतर लगेचच सायंकाळी आयोगाने गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध केली....

गुणवत्ता यादीसोबतच पसंतीक्रम व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्‍या सुविधेबाबतची माहिती आयोगाने जारी केली आहे. गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्‍या स्‍वरुपातील आहे.

अर्जामधील विविध दाव्‍यांच्‍या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्‍या दाव्‍यांमध्ये बदल होऊ शकतो. पर्यायाने उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो. उमेदवार अपात्र ठरु शकतो, असे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

MPSC Logo
Video : गंगापूर रोडवर जाताय? आधी 'ही' बातमी वाचा

दरम्‍यान, पसंतीक्रम निश्‍चितीसाठी उमेदवारांना ९ मेपर्यंत मुदत दिलेली असल्‍याने त्‍यानंतरच अंतिम निकाल (Final Result) जाहीर होणार आहे. करोना (Corona) महामारीमुळे गेली दोन वर्षे शैक्षणिक क्षेत्र ठप्प झालेले होते. अशात स्‍पर्धा परीक्षांचे वेळापत्रकही या कालावधीत पूर्णपणे कोलमडले होते.

MPSC Logo
Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

परिस्थिती पूर्वपदावर आल्‍यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षांच्‍या सुधारीत तारखा जाहीर करण्यात आल्‍या होत्‍या. याअंतर्गत राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० करीताची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC Logo
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

विशेष म्‍हणजे १८ एप्रिलपासून शुक्रवारपर्यंत मुलाखत प्रक्रिया पार पडली. मुलाखतीच्‍या शेवटच्‍या दिवशीची कार्यवाही आटोपल्‍यानंतर लगेचच आयोगाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्‍याने उमेदवारांकडून समाधान व्‍यक्‍त होत आहे.

Related Stories

No stories found.