छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : खा. संभाजीराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

कोल्हापूर | Kolhapur

कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bangalore) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचे पडसाद आता महाराष्ट्रभर (Maharashtra) उमटू लागले आहेत. शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे...

या घटनेनंतर कोल्हापूरसह सांगली, मिरज परिसरात संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकचे फलक असलेले सर्व व्यवसाय बंद पाडले आहेत. मिरजेत कर्नाटकच्या गाड्या फोडण्यात आल्या. या घटनेमुळे तणावाचे वातावरण बनले आहे. यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

दरम्यान, या घटनेवर छत्रपती संभाजीराजे भोसले (chhatrapati sambhaji raje bhosale) यांनी ट्विट करून निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची केंद्र आणि कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची केंद्र आणि राज्य सरकारने चौकशी करावी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com