पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची जिल्हा परिषदेच्या सीईओंशी चर्चा
पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने पहिली ते चौथीचे वर्ग std 1 to IV भरावेत म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad, Minister for School Educationयांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी Chief Executive Officers of the Zilla Parishad ऑनलाइन बैठकीत चर्चा केली.

पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी पालक आग्रही असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. काेरोना रुग्णवाढ आटोक्यात राहिल्यास बालवाडीपासूनचे वर्गही सुरू होऊ शकतात.

ऑनलाईन वर्गाला विद्यार्थी वैतागले आहेत. बालवाडीपासूनचे सर्व वर्ग भरावेत, अशी शालेय शिक्षण विभागाचीही इच्छा आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कसा राहतो, याकडे विभागाचे लक्ष आहे. दिवाळीनंतर म्हणजे १० नोव्हेंबरनंतर रुग्णांची आकडेवारी पाहून सर्व वर्ग खुले करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

सध्या शहरी भागातील इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरवले जात आहेत. तर ग्रामीण भागात इयत्ता ५ ते १५ वी पर्यंतचे वर्ग भरवले जात आहेत. ग्रामीण भागातील ४३ हजार ७४९ शाळांपैकी ४१ हजार ३७३ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये ३५ लाख ५३ हजार ४१७ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. शहरी भागातील १२ हजार ५७९ शाळांपैकी ९ हजार ९३६ शाळा सुरू झाल्या असून त्यामध्ये १५ लाख २८ हजार ९४१ विद्यार्थी उपस्थित आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

' येत्या १० नोव्हेंबर नंतर कोरोना राज्य कृती दलाची बैठक होईल. त्यात राज्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येईल. कोरोना रुग्णवाढ नसल्यास शाळा उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल. यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील'

वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com