यवतमाळ | Yavatmal
आठ वर्षांच्या मुलासह आईने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना यवतमाळ (Yavatmal) शहरातील अशोकनगर (Ashoknagar) परिसरात घडली आहे...
रेश्मा वंडकर (३८), पूर्वेश वंडकर (८) असे मृत आई व मुलाचे नाव आहे. सिंहगड रोड, कोल्हेवाडी, पुणे (Pune) येथील ते मुळ रहिवासी असून ते सध्या यवतमाळमधील अंबिकानगर येथे वास्तव्यास होते.
या घटनेबाबत परिसरातील नागरीकांनी पोलिसांना (Police) माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. वंडकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.