Monsoon Update : अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

Monsoon Update : अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
Monsoon 2021File Photo

मुंबई | Mumbai

मान्सून (Monsoon Update) परतीचा प्रवासाला आजपासून (बुधवार, दि.०६) सुरूवात झाली आहे. सर्वसामान्यपणे १७ सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास (return journey of monsoon) सुरू होतो असे मानले जाते. मात्र अलीकडील काळात मान्सूनच्या परतीचा प्रवास उशिरा सुरू होत असून, यंदादेखील मान्सूनच्या परतीचा प्रवास २० दिवस उशिराने सुरू झाला आहे.

मान्सूनच्या परतीचा हा प्रवास राजस्थान व संलग्न गुजरातच्या काही भागातून झाला आहे. पुढील चोवीस तास गुजरातचा काही भाग, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश काही भाग परतीसाठी अनुकूल आहे. असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

मान्सुनच्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्यानंतर, वातावरणातील आर्द्रता हळुहळू कमी झाली की, त्यानंतर हा प्रवास पुढच्या टप्प्यातून संपण्यासाठी वेळ लागत नाही. दरम्यान ५ आक्टोबरपासून पुढचे ४ ते ५ दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.

यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच म्हटलं आहे. १ जूनला या पावसाला (monsoon rain) सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला आहे.

Related Stories

No stories found.