Monsoon 2022 : आला रेsss... अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल

हवामान विभागाची माहिती
Monsoon 2022 : आला रेsss... अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात रेंगाळलेला मान्सून कोकणातील काही भागात दाखल झाला आहे. मान्सूनने आज महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे.

तसेच मान्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी भाग, संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकचा आणखी काही भाग व्यापला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण कर्नाटक व्यापण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com